अॅप्पल सायडर व्हिनेगर

एक चमचा लसूण वाटून घ्यावी त्यात एक चमचा अॅप्पल सायडर व्हिनेगर घालावं. हे मिश्रण तुमच्या नखांवर १० मिनिट्स लावून ठेवावं. त्यानंतर पाण्याने हात साफ करावे.

टूथपेस्ट

नखं चांगली वाढण्यासाठी टूथपेस्टचा वापरही करण्यात येतो. यासाठी तुम्हाला टूथपेस्ट तुमच्या नखांवर घासावी लागेल. टूथपेस्ट घासल्यामुळे नखांवर पिवळेपणा निघून जाईल.

टोमॅटो

अर्धा कप टोमॅटोच्या रसात 2 चमचे ऑलिव्ह ऑईल घालून आपल्या नखांवर 10 मिनिट्स लावून ठेवावे. दिवसातून दोन वेळा असं करावं.

बदामाचे तेल

बदामाचं तेल नखांवर लावून मसाज केल्यास, ब्लड सर्क्युलेशनदेखील वाढतं. त्यामुळे नखं वाढण्यास मदत होते. त्यासाठी रात्री रोज बदाम तेल लावून नखांचा मसाज करावा.

मोहरीचे तेल

नखांची चांगली वाढ होण्यासाठी मोहरीच्या तेलाचं मालिशदेखील चांगलं असतं. आठवड्यातून एक दिवस 15 ते 20 मिनिट्स नखांचे मालिश करावे. असं केल्यास, नखांची वाढ लवकर होते.

लिंबू

1 चमचा लिंबू रसामध्ये 3 चमचे ऑलिव्ह ऑईल घालून थोडं गरम करून घ्यावं. त्यानंतर 10 मिनिट्स नखं यामध्ये बुडवून ठेवावीत. तुम्ही रोज जरी हे करू शकत असाल तर लिंबाचे तुकडे नखांवर घासावेत. असं केल्यास, नखं पटकन वाढतात.

संत्र

नखं वाढण्यासाठी विटामिन सी खूपच फायदेशीर असतं. संत्र्यामध्ये विटामिन सी चं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. त्यासाठी तुम्ही ताज्या संत्र्याच्या रसामध्ये कमीत कमी 10 मिनिट्स नखं बुडवून ठेवावी. त्यानंतर अगदी हलक्या गरम पाण्याने नखं धुऊन त्यावर मॉईस्चरायजर लावावे.

लसूण

लसणाचा वापर नखांचं पोषण आणि वाढीसाठीदेखील होऊ शकतो. लसणाची पेस्ट आठवड्यातून दोन वेळा नखांवर लावल्यामुळे नखांना आवश्यक असणारं पोषण मिळतं.

दूध आणि अंडी

दूध आणि अंडी हे दोन्ही पदार्थ हाडं मजबूत करतात. तसेच याचा वापर नखांची मजबूती वाढवण्यासाठीदेखील करू शकता. यासाठी एका अंड्याचा सफेद भाग दुधामध्ये घालून फेटायचं आहे आणि यामध्ये 5 मिनिट्स तुमची नखं बुडवून ठेवा. आठवड्यातून 2-3 वेळा असं केल्यामुळे तुमच्या नखांना मजबूती मिळेल आणि वेगाने नखं वाढतील.

नारळाचं तेल

नारळाचं तेल नखांसाठीदेखील फायदेशीर असतं. त्यासाठी पाव कप नारळ तेल घ्यावं त्यात पाव कप मध आणि 4 थेंब रोझमेरी तेल घालून मिक्स करावं. हे मिश्रण थोडं गरम करून घ्यावं. त्यानंतर नखं 15 ते 20 मिनिट्स या तेलामध्ये बुडवून बसावं. आठवड्यातून असं २ वेळा केल्यास, नख वेगाने वाढतात आणि मजबूतही होतात.

VIEW ALL

Read Next Story