अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व कोण करणार? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
कर्णधारपदाचे दावेदार हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव जखमी असल्याने आता कॅप्टन कोण होणार? अशी चर्चा सुरू झालीये.
आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी बीसीसीआयचा निर्णय हा महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे सर्वांच या निर्णयावर लक्ष लागून राहिलंय.
रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-ट्वेंटीसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी बीसीसीआयला सुचवलंय. त्यामुळे आता आगामी मालिकेत कॅप्टन्सीवर चर्चा होतीये.
हार्दिक अन् सूर्या फिट नसतील तर रोहित शर्माच्या खांद्यावर जबाबदारी देण्याची शक्यता आहे.
मागील 2022 च्या विश्वचषकानंतर रोहित-कोहली यांनी एकही T-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
जर रोहित परतला तर याचा अर्थ टीम इंडिया त्याच्या नेतृत्वाखाली टी-ट्वेंटी वर्ल्ड कप देखील खेळवला जाईल.