छातीतला कफ जाता जात नाहीये? मग हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा

कफ

अनेकदा थंडीमुळे झालेला कफ लवकर जात नाही. छातीत जमा झालेला कफ दूर करण्यासाठी आज आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

हळद

हळद अँटी-बॅक्टेरियल असते. त्यामुळे कफ आणि खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यामुळे अनेक शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते.

खोकल्यापासून सुटका

मध, गूळ आणि हळद हे एकत्रित करून खावे, असे केल्याने खोकल्यापासून सुटका मिळते. त्यामुळे घश्याला देखील आराम मिळतो.

गुळण्या करा

घसा, सर्दी आणि खोकल्यावर उत्तम उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे आहे. नियमित सकाळी गुळण्या केल्याने घशाचा संसर्ग लवकर बरा होतो.

लिंबू

लिंबामध्ये असणारे सी-व्हिटॅमिन आरोग्यासाठी उपयुक्त असतात. लिंबामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार होणारी सर्दी आणि कफ यांची समस्या कमी होण्यास उपयोग होतो.

आले

आल्यामध्ये अनेक उपयुक्त गुणधर्म आहेत जे खोकला आणि सर्दीपासून आराम मिळवण्यासाठी योग्य असू शकतात. त्यामुळे चहामध्ये आल्याचा वापर करा.

सतर्क रहा

दरम्यान, वातावरण बदलाचा मोठा परिणाम शरिरावर होतो. त्यामुळे आता प्रत्येकाने आरोग्याच्या बाबतीत सतर्क असणं गरजेचं आहे.

VIEW ALL

Read Next Story