Sarfaraz Khan

सरफराजला क्लिन बोल्ड करणारी रोमाना जहूर आहे तरी कोण?

सरफराज खान

भारताचा देशांतर्गत क्रिकेटमधील स्टार खेळाडू सरफराज खान आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केलीये.

सरफराजचं लग्न

सरफराजने 6 ऑगस्ट रोजी रोमाना जहूर हिच्यासोबत लग्न केलं. रोमाना कश्मीरच्या शोफिया जिल्ह्यातील राहणारी आहे.

सोशल मीडियावर माहिती

सरफराजने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून चाहत्यांना लग्नाबाबत माहिती दिली.

पहिली भेट

सरफराज खानची पत्नी रोमना जहूरने दिल्लीतून एमएससीचे शिक्षण घेतलं होतं. सरफराजची बहिण आणि रोमना चांगल्या मैत्रिणी होत्या. बहिणीमुळेच सरफराज खान आणि रोमना यांची पहिली भेट झाली होती.

सरफराज क्लिन बोल्ड

पहिल्यांदा रोमनाला पाहताच सरफराज क्लिन बोल्ड झाला. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

सामना पाहिला

त्यानंतर रोमना चुलत भावासह सरफराजचा सामना पाहण्यासाठी जात होती. त्यावेळी त्यांची चांगली ओळख झाली होती.

घरच्यांच्या संमतीने लग्न

दोघांच्या नात्याविषयी कळाल्यानंतर सरफराज खानच्या परिवाराने रोमनाच्या घरी प्रस्ताव मांडला. त्यानंतर घरच्यांच्या संमतीने लग्नसोहळा पार पडला आहे.

VIEW ALL

Read Next Story