भारतीय फुटबॉल संघाला नव्या उंचीवर पोहोचवणारा स्टार फुटबॉलर सुनील छेत्री निवृत्त झाला आहे.
भारतीय फुटबॉल संघाला सोन्याचे दिवस दाखणाऱ्या सुनील छेत्रीने कुवेतविरुद्ध अखेरचा सामना खेळला.
मात्र, आता भारतीय संघासाठी 94 आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या सुनील छेत्रीची जादू चालणार नाही.
त्यामुळे आता सुनील छेत्रीचा उत्तराधिकारी कोण असेल? असा सवाल विचारला जातोय. यावर खुद्द छेत्रीने उत्तर दिलंय.
फुटबॉल संघाचं भविष्य उज्जवल आहे. संघ माझ्यासाठी थांबणार नाही. मनवीरसारखे आणखी प्लेयर्स माझा जागा भरून काढतील, असं छेत्रीने म्हटलंय.
लल्लियांझुआला छांगटे, रहीम अली आणि मनवीर सिंग यांसारखे खेळाडू भारतीय संघाला नव्या उंचीवर पोहोचवू शकतात.
विक्रम प्रताप सिंग हा सुनील छेत्रीसह स्ट्राईकर राहिला आहे. त्यामुळे विक्रम प्रताप सिंग याच्याकडून संघाला अपेक्षा असतील.