क्रिकेटच्या आवडीपोटी अनेक क्रिकेटपटूंनी आपलं शिक्षण अर्धवट सोडलेलं आहे. असे अनेक क्रिकेटपटू आहेत त्यांनी क्रिकेट खेळण्यासाठी शिक्षणाला सोडचिठ्ठी दिली आहे.
देशासाठी क्रिकेट खेळण्याच्या स्वप्नासाठी अगदी रोहित शर्मापासून, विराट कोहलीपर्यंत अनेकांनी शिक्षणाला मध्येच रामराम ठोकला आहे.
तरुण वयातच क्रिकेटच्या स्पर्धा आणि स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये सहभागी झाल्याने विराट, रोहित सारख्या बड्या क्रिकेटपटूंना आपलं शिक्षण नाइलाजाने अर्ध्यात सोडावं लागलं.
याच कारणामुळे आज असे अनेक भारतीय क्रिकेटपटू आहेत ज्यांच्या पत्नीनं त्यांच्यापेक्षा अधिक शिक्षण घेतलं आहे. अशा क्रिकेटपटूंची यादी पाहूयात...
रोहित शर्माने कॉलेजपर्यंतचं शिक्षण घेतलेलं नाही. मात्र त्याची पत्नी ऋतिकाने पदवीपर्यंत शिक्षण घेऊन स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीत काम केलं आहे.
विराट कोहलीने कॉलेजपर्यंतचं शिक्षण घेतलेलं नाही. मात्र त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने इकनॉमिक्समध्ये एमएपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. तिने बंगळुरुमधील माऊंट कॅरेमल कॉलेजमधून शिक्षण घेतलं.
भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा कधी कॉलेजला गेला नाही. मात्र त्याची पत्नी रिवाबा ही मेकॅनिकल इंजिनिअर आहे.
सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी दिविशा शेट्टी एकाच कॉलेजला होते. पदवीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर सूर्यकुमारने शिक्षण सोडलं. तर दिविशाने मात्र एमबीएपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.