कोण बेस्ट? हरभजन सिंह म्हणतो...
विराट कोहली म्हणजे भारतीय क्रिकेटची शान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या अफलातून कामगिरीच्या विराटने नाव कमवलंय.
दुसरीकडे, बाबर आझम पाकिस्तान संघाची कॅप्टन्सी सांभाळत मोलाची कामगिरी करताना दिसतोय.
कोण भारी? विराट की बाबर? असा सवाल अनेकदा विचारला जातो. अशातच टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह याने मोठं वक्तव्य केलंय.
विराटने स्वत:ला महान म्हणून प्रस्थापित केलं आहे, तर बाबर आझमला अजून खूप काम करायचं आहे, असं हरभजन सिंह म्हणतो.
एक दिवस बाबर आझम तिथं नक्कीच पोहोचेल कारण तो खूप चांगला खेळाडू आहे, असं मत देखील हरभजनने मांडलंय.
बाबर आझम कसोटी क्रिकेटमध्ये खूप चांगला आहे, पण कदाचित टी-ट्वेंटी क्रिकेट त्याला फारसा शोभत नाही, असं मत देखील हरभजन सिंहने व्यक्त केलंय.
बाबर आझम टी-ट्वेंटीमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे, लोक त्याला का फॉलो करत आहेत, माहीत नाही, असं म्हणत हरभजनने सिंहने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
विराटने 101 कसोटी, 260 एकदिवसीय आणि 97 टी 20 सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. विराटने या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 8 हजार 43, 12 हजार 311 आणि 3 हजार 296 धावा कुटल्या आहेत.
तर बाबर पाकिस्तानकडून 39 टेस्ट, 83 वनडे आणि 73 टी 20 मॅचमध्ये खेळला आहे. बाबरने या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 2 हजार 729, 3 हजार 985 आणि 2 हजार 620 धावा केल्या आहेत.