सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेली 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे.
भारतीय संघ 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत दमदार कामगिरी करत आहे.
भारतीय संघाने 6 फेब्रुवारी रोजी उपांत्य फेरीमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेचा 2 विकेट्सने पराभव करुन अंतिम फेरीत धडक मारली.
11 तारखेला बेनोनीमध्ये 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.
त्यापूर्वी 8 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियन संघादरम्यान दुसरा उपांत्य सामना होणार आहे.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानी संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं तर भारत आणि पाकिस्तानदरम्यान अंतिम सामना खेळवला जाईल.
पाकिस्तानी संघाने यंदाच्या 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेमध्ये आपले शेवटचे पाचही सामने जिंकले आहेत.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघही या स्पर्धेत अपराजित राहिला आहे. त्यांचा एक सामना अनिर्णित राहिला आहे.
19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेमध्ये भारताची कामगिरी कायमच चांगली राहिली आहे. भारताने ही स्पर्धा पाच वेळा जिंकली आहे.