पार्थिव पटेल आतापर्यंत चेन्नई, डेक्कन चार्जस, कोची, मुंबई, बंगळुरु आणि हैद्राबाद संघाकडून खेळला आहे. 139 सामन्यातील 137 वेळा क्रिजवर आलेला पटेल 13 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
या यादीत चेन्नईचा खेळाडू अंबाती रायडूही सामिल आहे. रायडू 166 सामन्यात 156 वेळा फलंदाजीला आला आहे. यामध्ये 13 वेळा तो खातं न खोलताचं बाद झाला आहे.
अजिंक्य रहाणेचा नंबरही या यादीत आहे. रहाणे 151 सामन्यात 141 वेळा क्रिजवर आला असून 13 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
कोलकाता नाइट राइडर्स संघ हरभजन सिंग या दिग्गज खेळाडू याआधी चेन्नई आणि मुंबई संघाकडूनही खेळला आहे. तो 163 सामन्यात 90 वेळा क्रिजवर आला आहे. यामध्ये 13 वेळा तो शून्यावर बाद झाला आहे.
किंग्ज इलेव्हन पंबाजचा स्पिनर पीयूष चावला विकेट्स काढण्यात भलेही आघाडीवर असला तरी धावा बनविण्यात मात्र 'ढ गोळा' ठरलाय. पियुष 165 सामन्यांत 13 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
मनदीप सिंगने 108 आयपीएल सामन्यांमध्ये 1692 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 6 अर्धशतके झळकली आहेत. मनदीपची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 77 आहे. या स्पर्धेत त्याने 175 चौकार आणि 37 षटकार मारले आहेत. मात्र मनदीप सिंग 14 वेळा शून्यावर बाद झाला.
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वाधिक वेळा डक आऊट होण्याचा विक्रम भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आहे. आयपीएलमध्ये 14 वेळा शून्यावर बाद झाला. रोहित आयपीएलमध्ये एकूण 227 सामने खेळला असून त्यानं 30.30 च्या सरासरीनं 5879 धावा केल्या आहेत.