त्यामुळे आता विल्यमसनला 2 कोटींबरोबर सर्व उपचारांचे खर्चही गुजरातच्या संघाकडून मिळणार आहे.
गुजरात टायटन्सने केन विल्यमसनला 2 कोटींच्या बेस प्राइजला विकत घेतलं होतं.
जखमी किंवा अर्ध्यात कंत्राट रद्द केलेल्या खेळाडूला एक रकमी पैसे द्यायचे की टप्प्याटप्प्यात द्यायचे हे त्या दोघांवर अवलंबून असतं. काही संघ आधी 50 टक्के आणि नंतर 50 टक्के रक्कम देतात.
मालिकेदरम्यान एखादा खेळाडू जखमी झाला तर त्याला पूर्ण पर्वाचं मानधन देण्याबरोबरच त्याच्या उपचारांचा खर्चही त्या आयपीएल संघ व्यवस्थापनालाच करावा लागतो.
करार संपण्याआधी एखाद्या संघाने खेळाडूला करार मुक्त करण्याचा निर्णय घेतला तर त्या खेळाडूला त्या पर्वाचं पूर्ण मानधन संघाला द्यावं लागतं.
एखाद्या खेळाडू आयपीएल काही ठराविक सामन्यांसाठी उपलब्ध असेल तर त्याला त्या त्या सामन्यांनुसार मानधन दिलं जातं.
सराव आणि सराव शबिरामध्ये सहभागी होण्याआधी एखादा खेळाडू जखमी झाला तर त्याला मानधन दिलं जात नाही.
बीसीसीआयच्या नियमानुसार एखादा खेळाडू पूर्ण सत्रासाठी उपलब्ध असेल तर त्याला संपूर्ण मानधन द्यावं लागतं.
बीसीसीआयच्या नियमांनुसार केन विल्यमसन स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी त्याला पर्वासाठीचं पूर्ण मानधन मिळणार आहे.
आज म्हणजेच 3 एप्रिल रोजी केन विल्यमसन मायदेशी रवाना झाला.
चेन्नई सुपर किंग्जविरोधातील सामन्यात बॉण्ड्रीजवळ फिल्डींग करताना विल्यमसन जखमी झाला.
गुजरात टायटन्सकडून खेळणारा न्यूझीलंडचा केन विल्यमसन पहिल्याच सामन्यानंतर आयपीएल 2023 च्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.