वर्ल्ड कपआधी रोहित शर्मा मोडणार 'हे' पाच बलाढ्य रेकॉर्ड!
रोहित शर्मा आशिया कपच्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडू बनणार आहे.
आशिया कपच्या इतिहासातने रोहित शर्मा 22 सामने खेळले आहेत, तर सचिन तेंडूलकरने 23 सामने खेळलेत. आता रोहित आघाडी घेणार आहे.
आशिया कपच्या इतिहासामध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा रेकॉर्ड रोहितच्या नावावर होऊ शकतो.
आशिया कपमध्ये शाहिद आफ्रिदीने 26 षटकार मारलेत. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या रोहित शर्माच्या नावावर 17 सिक्स आहेत.
आशिया कपमध्ये 1000 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज होईल. सध्या रोहित शर्माच्या नावावर 745 धावा आहेत.
आशिया कपमध्ये सनथ जयसूर्याने 1220 धावा आणि कुमार संगकाराने 1075 धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय सामन्यात 10,000 वनडे धावा पूर्ण करणारा सहावा भारतीय खेळाडू होणार आहे.
10 हजारहून अधिक एकदिवसीय धावा पूर्ण करण्यासाठी रोहितला फलंदाजांच्या यादीत सामील होण्यासाठी आणखी 175 धावांची आवश्यकता आहे.
कसोटी असो वा वनडे सामना सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार मारण्याच्या रेसमध्ये रोहित शर्माचं नाव आहे.
युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलने 553 सिक्स खेचले आहेत. तर रोहित शर्माने आत्तापर्यंत 534 सिक्स लगावले आहेत.