भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू कोण?

भारतीय संघांमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू कोण? असा प्रश्न तुम्हाला विचारला तर एक क्रिकेटचाहता म्हणून त्याचं उत्तर तुम्ही ठामपणे देऊ शकता का?

कमी वयात भारतासाठी खेळणारे खेळाडू कोण?

सर्वात कमी वयात भारतासाठी खेळणाऱ्या खेळाडूंबद्दल तुम्हाला ठाऊक नसेल तर इथे आपण याच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर पाहूयात ही लिस्ट...

मिस्टर डिपेण्डेबल

मिस्टर डिपेण्डेबल अशी ओळख असलेल्या राहुल द्रविडने वयाच्या 24 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

कॅप्टन कूल

महेंद्रसिंह धोनीने वयाच्या 23 व्या वर्षी भारतीय संघामध्ये पदार्पण केलं. धोनी हा एकमेव भारतीय कर्णधार आहे ज्याने आयसीसीचे सर्व चषक जिंकले आहेत.

सुनिल गावस्कर

लिटील मास्टर अशी ओळख असलेल्या सुनील गावसकर यांनी वयाच्या 21 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवलं.

गौतम गंभीर

2011 साली भारताला एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक जिंकून देण्यात अंतिम सामन्यात 97 धावांचं मोलाचं योगदान देणारा गौतम गंभीर वयाच्या 21 व्या वर्षापासून भारतीय संघातून खेळतोय.

मोहम्मद अझरुद्दीदन

भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या मोहम्मद अझरुद्दीनने वयाच्या 21 व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवलं.

रोहित शर्मा

भारतीय कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माने वयाच्या 20 व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

विरेंद्र सेहवाग

भारताचा स्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवागने वयाच्या 20 व्या वर्षी भारताकडून खेळणार सुरुवात केली.

विराट कोहली

अनेक विक्रम ज्याच्या नावावर आहेत अशा विराट कोहलीने वयाच्या 19 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल ठेवलं. विराट हा मूळचा दिल्लीचा आहे.

कपिल देव

भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव हे वयाच्या 19 व्या वर्षापासून भारतीय संघासाठी खेळत होते.

सौरव गांगुली

भारतीय संघाला विजयाची सवय लावणारी कर्णधार, क्रिकेकडे पाहण्याचा भारतीय संघाला दृष्टीकोन बदलणारा कर्णधार अशी ओळख असलेला सौरव गांगुली वयाच्या 19 व्या वर्षापासून भारतासाठी खेळतो.

युवराज सिंग

भारतीय संघातील माजी डावखुरा फलंदाज युवराज सिंग हा सर्वात कमी वयात क्रिकेट खेळणाऱ्या भारतीयांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. युवराज भारतीय संघातून पहिला सामना खेळला तेव्हा त्याचं वय केवळ 18 वर्ष इतकं होतं.

सचिन तेंडुलकर

अनेक विक्रम ज्याच्या नावे आहेत अशा सचिन तेंडुलकरच्या नावावर हा विक्रमही आहे. सचिन तेंडुलकरने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय सामन्यामधून क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवलं होतं.

VIEW ALL

Read Next Story