बदाम खाण्याचा सल्ला

आरोग्याला सर्वात फायद्याच्या सुक्यामेव्यामध्ये बदामाचा समावेश होतो. त्यामुळेच अनेक आहारतज्ज्ञही बदाम खाण्याचा सल्ला देतात.

पोषकतत्वही फायद्याचे

बदामामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, ई तसेच मॅग्नेशिअम, फॉस्फोरससारखे पोषकतत्वही असतात.

स्मरणशक्ती वाढते

बदाम योग्य पद्धतीने खाल्ल्यास त्याचा आरोग्याला फायदा होतो. तसेच बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढण्याबरोबरच मेंदू तल्लख होतो.

ही पद्धत उत्तम

खरं तर बदाम खाण्याची एक योग्य पद्धत असते. ही पद्धत व्यवस्थीत फॉलो केली तर बदाम खाण्याचा अधिक फायदा नक्कीच मिळतो.

भिजवलेले बदाम अधिक फायद्याचे

कच्चे बदाम खाण्याऐवजी रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी रिकाम्या पोटी खाणं अधिक फायद्याचं ठरतं.

उष्णता काही प्रमाणात कमी होते

बदाम भिजवून खाल्ल्याने त्यामधील उष्णता काही प्रमाणात कमी होते त्यामुळेच उन्हाळतही तुम्ही बदाम खाऊ शकता.

पचनासंदर्भातील समस्या दूर

बदामामध्ये मोठ्या प्रमाणात अॅण्टीऑक्सीडंट असतात. त्यामुळे पचनासंदर्भातील समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळे इतरही अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.

पोट भरल्यासारखं वाटतं

बदामामध्ये मोठ्याप्रमाणात फायबरचं प्रमाण असतं. त्यामुळे बदाम खाल्ल्याने बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं.

वजन कमी करण्यासाठी फायदा

बदाम खाल्ल्याने पोट भरल्यासारखं वाटत असल्याने वजन कमी करण्यासाठीही ते फायद्याचं ठरतं.

सुरकुत्या पडण्याची समस्या दूर होते

बदामामधील 'व्हिटॅमिन ई'मुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या पडण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

हाडं मजबूत होण्यास मदत

बदामामामध्ये फॉस्फोरस असतं. त्यामुळे हाडं मजबूत होण्यास आणि दात बळकट होण्यास मदत होते.

डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

Disclaimer - वरील माहिती सर्वसामान्य माहिती आणि संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

VIEW ALL

Read Next Story