2024 मध्ये Google वर 'या' टॉप 10 भारतीयांना लोकांनी सर्वाधिक केलं सर्च

Pooja Pawar
Dec 12,2024


2024 हे वर्ष संपायला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. गूगलने त्यांचा सर्च डेटा जगासमोर आणला असून यानुसार वर्षभरात कोणत्या गोष्टी नेटकऱ्यांनी सर्वात जास्त सर्च केल्या याची यादी देण्यात आली आहे.


टॉप 10 भारतीयांची यादी पाहूयात ज्यांना लोकांनी Google वर सर्वात जास्त वेळा सर्च केलं.

विनेश फोगाट :

विनेश फोगाट हिला यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील अंतिम सामन्यापूर्वी केवळ 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला बाद करण्यात आलं होतं. ज्यामुळे तिला रिकाम्या हाताने भारतात परतावं लागलं.

नीतिश कुमार :

नीतिश कुमारची पार्टी जनता दलाने लोकसभेत बिहारमध्ये चांगले प्रदर्शन केले. ज्यामुळे त्यांची राजकीय स्थिती जास्त मजबूत झाली. त्यांच्या समर्थकांनी त्यांना फीनिक्स पक्षाची उपमा दिली होती.

चिराग पासवान :

चिराग पासवानने लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांचा पक्ष लोक जनशक्ति पार्टी याचा मजबूत केले होते. भाजप सोबत युती केल्याचा त्यांना फायदा झाला.

हार्दिक पंड्या :

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात यंदा आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचांगलं प्रदर्शन करू शकली नाही. तसेच टी 20 वर्ल्ड कपमधील दमदार खेळी, पत्नी नताशा सोबत झालेला घटस्फोट इत्यादी कारणामुळे हार्दिक 2024 मध्ये फार चर्चेत राहिला.

पवन कल्याण :

जून 2024 मध्ये पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याच्या पक्षाला विधानसभा आणि लोकसभेत चांगलं यश मिळालं होत.


तर गूगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या भारतीयांमध्ये शशांक सिंह, पूनम पांडे, राधिका मर्चंट, अभिषेक शर्मा, लक्ष्य सेन यांच्या नावाचा देखील समावेश आहे.

VIEW ALL

Read Next Story