भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या विश्वचषक स्पर्धेत दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून तो टीम इंडियापासून दूर आहे.
विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या पायावर उपचार सुरु होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हार्दिक पांड्या आता दुखापतीतून सावरला आहे. त्याने नेटमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीचा सरावही सुरु केलाय.
बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमच्या ग्रीन सिग्नलनंतर हार्दिक पांड्याचं संघात कमबॅक होऊ शकतं. लवकरच तो टीम इंडियातून खेळताना दिसणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया टी20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे.
या दौऱ्यात हार्दिक पांड्याची टीम इंडियात निवड करण्यात आलेली नाही.पण जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत तो खेळताना दिसू शकतो.
अफगाणिसा्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत सूर्यकुमार यादवकडे टी20 संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.