भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात राहुल द्रविड हेच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असतील हे निश्चित झालं आहे. बीसीसीआयने राहुल द्रविड यांचा कार्यकाळ वाढवला आहे.
राहुल द्रविड यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये असलेल्या सदस्यांचा करारही वाढवला आहे.
बीसीसीआयने एक निवेदन जारी करत राहुल द्रविड यांचा कार्यकाळ वाढवत असल्याचं जारी केलं. पण हा कार्यकाळ कधीपर्यंत असणार याबाबत निवेदनात कोणतीही माहिती नाही.
बीसीसीआयने राहुल द्रविड यांचा कार्यकाळ वाढवलाव, पण त्यांच्या सॅलरीत वाढ करण्यात आली आहे का, याबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे.
पहिल्या कार्यकाळात राहुल द्रविड यांना 10 कोटी पगार मिळत होता. आता दुसऱ्या कार्यकाळातही राहुल द्रविड यांना 10 ते 12 कोटी रुपये पगार दिला जाणार असल्याची माहिती आहे.
राहुल द्रविड यांच्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात दक्षिण आफ्रिका दौऱ्याने होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 एकदिवसीय, 3 टी20 आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे.
राहुल द्रविड यांच्यासमोर सर्वात मोटं आव्हान असणार आहे ते टीम इंडियाला आयसीसी ट्ऱॉफी जिंकून देण्याचं. 2024 मध्ये टी20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळवली जाणार आहे.