भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.

'मिया भाई'च्या या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. सिराजच्या इन्स्टा पोस्टने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

मोहम्मद सिराजने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ह्दय तुटलेले पाच इमोजी (Broken Heart Emoji) शेअर केले आहेत.

मोहम्मद सिराजच्या या पोस्टनंतर चाहते संभ्रमित झाले आहे. सिराजचं हृदय कोणामुळे तुटलं, नेमकं काय झालं असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मिस्टर 360 अर्थात सूर्यकुमार यादवनेही हृदय तुटलेला इमोजी शेअर केला होता.

हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवल्याने सूर्या नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या..

पण मोहम्मद सिराजला काय झालं याबाबत अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. सिराज आयपीएलमध्ये आरसीबी संघाकडून खेळतो

VIEW ALL

Read Next Story