टी20 वर्ल्ड कप 2024 सर्धेत यजमान अमेरिकेने मोठा उलटफेर केला. बलाढ्य पाकिस्तानचा पराभव करत अमेरिकेने इतिहास रचला.

अमेरिकेच्या या ऐतिहासिक विजयाचा हिरो होता वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावलळकर, सुपर ओव्हरमध्ये सौरभने दमदार गोलंदाजी केली.

पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची गरज होती. पण सौरभ नेत्रावलकरच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानला केवळ 13 धावा करता आल्या.

सौरभ नेत्रावलकर या मुळचा भारतीय असून टीम इंडियाच्या अंडर 19 संघाचं त्याने प्रतिनिधित्व केलं आहे.

सौरभ नेत्रावळच्या पत्नीचं नाव स्निग्धा मुप्पला असं असून अमेरिका-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी ती स्टेडिअममध्ये उपस्थित होती.

स्निग्धा मुप्पला ही एक उत्कृष्ट कत्थक नृत्यांगणा आहे. कत्थकचे अनेक फोटो तीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

स्निग्धा मुप्पलाला अॅडव्हेंचरची आवड असून ती मोकळया वेळेत सौरभ नेत्रावलकरबरोबर भटकंती करते. सोशल मीडियावरही ती सक्रिय असते.

VIEW ALL

Read Next Story