2024 मध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच युगांडा देशाची एन्ट्री झाली आहे. झिम्बाब्वे सारख्या अनुभवी संघाचा पराभव करत युगांडाने ही कमाल केली.
टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये एकूण 20 संघ भाग घेणार आहेत. यात युगांडाचाही समावेश आहे.
युगांडा संघाने आपल्या पहिला आंतरराष्ट्रीय टी20 सामना 2019 मध्ये खेळला होता. अवघ्या पाच वर्षात युगांडाने थेट वर्ल्ड कपध्ये जागा मिळवली आहे.
पण तुम्हाला माहित आहे का, युगांडा संघातील खेळाडूंना पगार किती मिळतो. दोनवेळच्या जेवणासाठीही त्यांना संघर्ष करावा लागतो
युगांडा संघातील खेळाडूंना 2020 मध्ये अवघा 6000 हजार महिना पगार मिळत होता. कोव्हिडमुळे त्यांना कमी पैसे देण्यात येत होते.
आता त्यांच्या पगारात वाढ करण्यात आली असून प्रत्येक सामन्यासाठी खेळाडूंना भारतीय रुपयानुसार 8200 रुपये दिले जातात.
टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेची सुरुवात 4 जूनला होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.