तुम्हाला माहित आहे का क्रिकेटमध्ये भरपूर पैसा असला तरी भारताची आघाडीची टेनिस खेळाडू सानिया मिर्झा भारतीय क्रिकेटपटूंपेक्षाही श्रीमंत आहे.

भारताची अव्वल टेनिसपटू असलेल्या सानिया मिर्झाने देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावलं आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सानियाने अनेक विजय मिळवलेत.

कमाईच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक भारतीय क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय सामने, आयपीएल खेळूनही सानिया मिर्झाच्या आसपासही नाहीत

युवा खेळाडू सोडाच भारतीय क्रिकेट संघातील मोठ्या खेळा़डूंची कमाई देखील सानिया मिर्झा इतकी नाहीए.

एका रिपोर्टनुसार सानिया मिर्झाचं नेटवर्थ जवळपास 214 कोटी रुपये इतकं आहे. भारतीय क्रिकेटचा स्टार रोहित शर्माचं नेटवर्थ 214 कोटी रुपये आहे.

ऋषभ पंतचं नेटवर्थ 100 कोटी रुपये आहे. हार्दिक पांड्या 91 कोटींचा मालक आहे. तर जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमारची कमाई 55 कोटीच्या आसपास आहे.

कमाईच्या बाबतीत विराट कोहली सानिया मिर्झापेक्षा खूप पुढे आहे. विराट कोहलीचं नेटवर्थ जवळपास 634 कोटी रुपये इतकं आहे.

VIEW ALL

Read Next Story