सामन्यापूर्वी सौरव गांगुलीचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाला...
भारत आणि पाकिस्तानचे संघ 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमने सामने येणार आहेत.
पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघाचा सामना पाहण्यासाठी आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अशातच भारत पाकिस्तान सामन्याआधी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने अजब गजब विधान केलं आहे.
भारत पाकिस्तान सामना आता एकतर्फी होत असल्याचं दिसतंय. सर्व सामन्यात भारताचं पारडं जड राहिलंय. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दर्जेदार सामने झालेले नाहीत, असं गांगुली म्हणतो.
भारत आणि पाकिस्तान म्हणजे हाय द जोश. मात्र, तो आता राहिल्याचं दिसत नाही. त्याऐवजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया हा सामना पाहण्यात मजा येते, असं सौरव गांगुली म्हणाला आहे.
युझी चहल गेल्या वर्षी टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमचा हिस्सा होता, पण त्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
भारताकडे कुलदीप आणि रवी बिश्नोईसारखे चांगले स्पिनर आहेत, पण यझुवेंद्र चहल विश्वचषकात निर्णायक ठरू शकतो, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.