वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला मोठा धक्का

'हा' स्टार खेळाडू खेळणार नाही?

भारतात वनडे विश्वचषक

येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात वनडे विश्वचषक सुरू होणार आहे. यासाठी सर्व संघांकडे तयारीसाठी 100 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे.

पहिला सामना 8 ऑक्टोबरला

टीम इंडिया आपला पहिला सामना 8 ऑक्टोबरला खेळणार आहे. अशातच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

स्पर्धेपूर्वी मोठा धक्का

पाठीच्या दुखापतीने अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नसलेल्या श्रेयस अय्यरच्या रूपाने यजमान भारताला स्पर्धेपूर्वी मोठा धक्का बसू शकतो.

अजूनही अनफीट

आशिया कपपर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, तो अजूनही अनफीट असल्याचं समोर आलंय.

बीसीसीआय अधिकाऱ्यांची माहिती

श्रेयस अय्यर विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त होईल अशी आशा आहे, परंतु याबाबत तो निश्चितपणे काहीही सांगू शकत नाही, अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्यांनी सुत्रांना दिली आहे.

प्रकृतीबद्दल चिंता

शस्त्रक्रियेमुळे अय्यर आयपीएलच्या 16 व्या हंगामातून पूर्णपणे बाहेर होता. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती.

संजू सॅमसन

श्रेयस अय्यर मेगा स्पर्धेतून बाहेर पडला तर सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांना मुख्य संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

VIEW ALL

Read Next Story