शोएब मलिकची तिसरी पत्नी खूपच सुंदर, सना जावेद आहे तरी कोण?

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिक आणि सना जावेद यांनी विवाह केला आहे. ते बर्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते.

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने काही दिवसांपुर्वी लग्न-घटस्फोटासंदर्भात पोस्ट शेअर केली होती.

त्याच्या 2 दिवसांतच शोएब आणि सना दोघांनीही त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत.

शोएबचे पहिले लग्न आयेशा सिद्दीकीसोबत झाले होते. दुसरे लग्न 2010 मध्ये माजी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झासोबत झाले होते.

असे असले तरी शोएबने आतापर्यंत सानियापासून घटस्फोटाबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदचा घटस्फोट झाला आहे. सना जावेदने 2020 मध्ये उमेर जसवालशी लग्न केले. पण 2023 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

2010 मध्ये शोएब मलिक आणि सानिया मिर्झाचे हैदराबादमध्ये लग्न झाले होते. 2018 मध्ये सानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-वडील झाले.

30 ऑक्टोबर 2018 रोजी सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा मुलगा इझान मिर्झा मलिकचा जन्म झाला.

सना जावेदनेही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या बायोमध्ये तिचे नाव बदलून सना शोएब मलिक असे ठेवले आहे.

VIEW ALL

Read Next Story