शिवपुराण : मृत्यूपूर्वी मानवाला मिळतात हे 4 संकेत

शिवपुराण हे सनातन धर्मातील विशेष पुराणांपैकी एक असून यात व्यक्तीच्या जन्म आणि मृत्यूशी संबंधित अनेक गोष्टींचं वर्णन केलंय. मृत्यूपूर्वी व्यक्तीला कोणते संकेत मिळतात याबद्दल सांगितलं आहे.

शिवपुराणानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येऊ लागतो तेव्हा त्याला अनेक प्रकारचे संकेत मिळत असतात.

शिवपुराणानुसार मृत्यूपूर्वी एखाद्या व्यक्तीच्या पाच इंद्रियांचं कार्य पूर्णपणे बंद झाली तर समजा मृत्यू जवळ आलाय.

मृत्यूपूर्वी शरीर पांढरं किंवा निळं पडतं. काही लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी लाल डाग दिसतात.

एखाद्या व्यक्तीचा डावा हात अचानक मुरडायला लागतो किंवा टाळू कोरडा होऊ लागते, याचा अर्थ त्या व्यक्तीकडे जास्त वेळ नसतो.

शिवपुराणानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीला चंद्र-तारे नीट दिसणे बंद होते किंवा एखाद्या व्यक्तीला काचेत किंवा पाण्यात आपलं प्रतिबिंब दिसत नाही. तेव्हा तुमचा मृत्यू अगदी जवळ आल्याचं समजा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story