मोहालीत अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात शिवम दुबेने 1 विकेट घेत अर्धशतक झळकावलं.

या मॅचमध्ये शिवम दुबेच्या 60 रनची खेळी खेळून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या विजयासह टीम इंडिया सिरजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतलीये.

शिवम दुबेने भारताकडून खेळताना एकाच टी-20 सामन्यात अर्धशतक आणि एक विकेट घेणारा चौथा खेळाडू ठरला आहे.

यापूर्वी एका टी-20 सामन्यात हार्दिक पांड्या, युवराज सिंग आणि विराट कोहली यांनी अर्धशतक झळकवण्याचा पराक्रम केला आहे.

युवराज सिंगने 3 वेळा, विराट कोहलीने 2 वेळा आणि हार्दिक पांड्याने 1 वेळा अशी कामगिरी केली आहे. त्याचवेळी शिवम दुबे हा असा विक्रम करणारा खेळाडू बनला आहे.

एशियन गेम्स 2023 नंतर दुबेचा हा पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता.

सामना जिंकणाऱ्या कामगिरीमुळे शिवम दुबेला मॅन ऑफ द मॅच देण्यात आला.

VIEW ALL

Read Next Story