शकुनीचा वध कोणी केला होता?

भांजे

भांजे..... असं म्हणत बहिणीच्या पुत्रांना पावलोपावली मार्गदर्शन करणारा आणि सतत कटकारस्थानं रचणारा कौरवांचा शकुनी मामा माहितीये?

कुरुक्षेत्र

शकुनीला कुरुक्षेत्रात झालेल्या युद्धासाठी प्रमुख दोषी मानलं जातं. गांधारीच्या याच भावानं दुर्योधनाच्या कटकारस्थानांना वाव दिल्याचं सांगितलं जातं.

वध

महाभारत युद्धात सहदेवानं शकुनी आणि उलूक यांच्यावर वार केला आणि पुढं उलूकाचा वध केला.

विलाप

पुत्राला अंतिम श्वास घेताना पाहून शकुनीनं विलाप केला आणि तो तिथून पळ काढताना दिसला.

पाठलाग

सहदेवानं शकुनीचा पाठलाग केला आणि त्यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झालं. याच सहदेवाच्या हातून शकुनीचा अंत झाला.

युद्धात सहभाग

महाभारत युद्धाच्या 18 व्या दिवशी शकुनीचा वध झाला होता. त्याच्या इतरही भावांनी या युद्धात सहभाग घेतला होता ज्यांचा वध अर्जुनानं केल्याचं सांगितलं जातं.

VIEW ALL

Read Next Story