बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअम येथे भारत आणि नेदरलँड यांच्यात सारखी फेरीतील सामना खेळवला जात आहे.
रोहित शर्माने या सामन्यात दमदार अर्धशतक ठोकलं. याच सामन्यात त्याने विराट कोहलीच्या मित्राचा रेकॉर्ड मोडला आहे.
नेदरलँडविरुद्ध रोहितने एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने अव्वल स्थान पटकावलं. रोहित शर्मा एकाच वर्षात 59 सिक्स मारण्यात यशस्वी झाला.
एबी डिविलियर्स असून त्याने 2015मध्ये संपूर्ण वर्षात 58 षटकार मारले होते. त्यामुळे अशात आता रोहित डिविलियर्सला मागे टाकलंय.
या यादीतील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल आहे. त्याने 2019 मध्ये 56 सिक्स खेचले होते.