दिवाळीचा सण सध्या सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो आहे. आज लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे.
देवी लक्ष्मीची आज मनोभावे पूजा केली जाते. आपल्या घरात समृद्धी आणि भरभराट होवो यासाठी ही पुजा केली जाते.
परंतु तुम्हाला माहितीये लक्ष्मीपूजनाला केरसुणीचीही पूजा केली जाते.
बाजारात तुम्ही खरेदीसाठी गेलात तर बाजारपेठांमध्ये गेलात तर तुम्हाला केरसुणी पाहायला मिळतील.
घरातील सर्व वाईट शक्ती जाऊन येथे समृद्धी आणि भरभराट येण्यासाठी याची पूजा ही विशेष महत्त्वाची ठरते.
शिंदीच्या झाडापासून तयार केलेल्या केरसुणीला यावेळी महत्त्व असते.
लक्ष्मी स्वच्छतेच्या ठिकाणी वास करते त्यासाठी केरसुणीची पूजा केली जाते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)