रणवीरने घेतला धोनीचा Kiss! पत्नी साक्षी कमेंट करुन म्हणाली...

कायम चर्चेत अन् सोशलवर सक्रीय

अभिनेता रणवीर सिंग हा तसा कायमच चर्चेत असतो. रणवीर सोशल नेटवर्किंगवर चांगलाच सक्रीय आहे.

रणवीर खेळप्रेमी

रणवीरला खेळांबद्दल असणारी आवड काही लपून राहिलेली नाही. बास्केटबॉल असो, फुटबॉल असो किंवा क्रिकेट असो रणवीर सगळीकडे दिसतो.

कृतीमधून अनेकदा दिसून आलं क्रिकेट प्रेम

क्रिकेटबद्दल रणवीरला खास प्रेम आहे. त्याच्या कृतीमधून अनेकदा हे दिसून आलं आहे.

'83' चित्रपटात मुख्य भूमिका

भारताने 1983 साली कपील देव यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा एकदिवसीय क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकल्याची गोष्ट मोठ्या पडद्यावर साकारताना '83' चित्रपटात रणवीरनेच मुख्य भूमिका साकारलेली.

कपिल देव यांची भूमिका साकारलेली

रणवीरने कपिल देव यांची भूमिका अगदी उत्तम पद्धतीने साकारली होती. त्याच्या या भूमिकेसाठी त्याचं कौतुकही झालं होतं.

वर्ल्डकपच्या पहिल्याच दिवशी धोनीला भेटला

सध्या सुरु असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रणवीरने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची भेट घेतली. रणवीरनेच या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.

धोनीला किस केला

रणवीरने शेअर केलेल्या फोटोंपैकी एका फोटोत तो धोनीच्या गालावर किस करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना रणवीरने धोनीला मोठा भाऊ म्हटलं आहे.

साक्षी धोनीनेही केली कमेंट

'मेरा माही' अशी कॅप्शनसहीत लिजेंड, सर्वाकालीन सर्वोत्तम, हिरो, आयकॉन आणि मोठा भाऊ हे हॅशटॅग रणवीरने वापरलेत. धोनीची पत्नी साक्षीनेही या फोटोवर हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली.

रामचरणनेही धोनीची भेट घेतली

दोनच दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणने धोनीची भेट घेतली होती. भारताचा अभिमान असलेल्या धोनीला भेटून आनंद झाला अशी कॅप्शन रामचरणने फोटोला दिली होती.

VIEW ALL

Read Next Story