IPL च्या इतिहासात सर्वांत कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकवणारे खेळाडू

यशस्वी जयस्वाल

IPL 2023 मध्ये जयस्वालने राजस्थान रॉयल्सकडून खेळत अवघ्या 13 बॉलमध्ये अर्धशतक ठोकले होते. आयपीएल 2023 मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक मारण्याचा रेकॉर्ड यशस्वी जयस्वालच्या नावावर आहे.

के एल राहुल

आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक मारणाऱ्यांच्या लिस्टमध्ये दूसऱ्या क्रमांकावर LSG कडून खेळणाऱ्या केएल राहुलचे नाव येते. राहुलने पंजाबविरूद्ध आयपीएल 2018 मध्ये 14 बॉलातच अर्धशतक लावले होते

पॅट कमिंस

ऑस्ट्रलियन ऑलराऊंडर पॅट कमिंसने केकेआर कडून खेळताना आयपीएल 2022 मध्ये अवघ्या 14 बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केलं होते.

युसूफ पठान

आयपीएलच्या मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्यांच्या लिस्टमध्ये युसूफ पठान हा तिसऱ्या क्रमांकावर येतो. त्याने 2014 च्या झालेल्या IPL मध्ये फक्त 15 बॉलमध्ये वेगवान अर्धशतक झाडले होते.

सुनील नरीन

इंडियन प्रिमीअर लिग 2017 मध्ये केकेआरच्या सुनील नरीनने 15 बॉलमध्ये आपले 50 रन्स पूर्ण केले होते. नारायण हा ऑफस्पिनर असून केकेआरकडून त्याने ओपनिंगसुद्धा केलेली आहे.

निकोलस पूरन

2023 च्या झालेल्या आयपीएलमध्ये निकोलस पूरनने लखनऊ सुपर जायंट्स कडून खेळताना अवघ्या 15 बॉलमध्ये अर्धशतक ठोकले होते.

सुरेश रैना

चेन्नई सुपर किंग्सचा चिन्नाथाला म्हणून ओळखऱ्या जाणाऱ्या सुरेश रैनाने आयपीएल 2014 मध्ये 16 बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केलं.

ईशान किशन

ईशान किशनने मुंबई इंडियन्सकडून खेळताना IPL 2021 मध्ये 16 बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केलं होत.

VIEW ALL

Read Next Story