टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ईशान किशन सध्या चांगलाच चर्चेत आहे. बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून ईशान किशनला डच्चू देण्यात आला आहे.

गेले काही दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला ईशान किशन सघ्या आयपीएलच्या तयारीत व्यस्त आहे. सघ्या मुंबई इंडियन्सबरोबर तो सराव करतोय.

या सराव शिबिरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. यात ईशान किशन श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या बॉलिंग अॅक्शनची नकल करताना दिसतोय.

25 वर्षांचा ईशान किशन रन-अप घेण्याआधी लसिथ मलिंगासारखी चेंडूची पप्पी घेतानाही दिसतोय.

विशेष म्हणजे लसिथ मलिंगसमोबरच ईशान किशन त्याची नकल करतोय. ईशानची नकल पाहून मलिंगालाही हसू आवरत नाहीए.

ईशान किशन जामनगरमध्ये झालेल्या अनंत अंबानी-राधीक मर्चंटच्या प्री वेडिंग सोहळ्यातीह सहभागी झाला होता. यावेळी त्याने ब्राव्होबरोबर फोटोशूट केलं.

ईशान किशनने बीसीसीआयच्या सूचनांचं पालन न करता स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे बीसीसीआने त्याला कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून काढून टाकलं.

VIEW ALL

Read Next Story