धडाकेबाज खेळी

पाकिस्तानविरुद्ध रहमानुल्ला गुरबाजने 14 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 151 धावांची धडाकेबाज खेळी केली.

पराभवानंतरही केला विक्रम

वयाच्या 21 व्या वर्षी सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंचा विक्रम करण्याचा मान रहमानुल्ला गुरबाजने केला आहे.

सचिनलाही टाकलं मागे

अफगाणिस्तानसाठी 23 वनडे खेळलेल्या गुरबाजचे हे पाचवे शतक होते. वयाच्या 21 व्या वर्षी रहमानुल्लाने सचिनपेक्षा जास्त शतके ठोकली आहेत.

गुरबाजने मोडला सचिनचा विक्रम

मास्टर ब्लास्टर सचिनने वयाच्या 16 व्या वर्षी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. मात्र 21 व्या वर्षी त्याला केवळ 4 शतके झळकावता आली.

21व्या वर्षी शतके ठोकणारे खेळाडू

6 - क्विंटन डी कॉक, 6 - उपुल थरंगा, 5 - रहमानउल्ला गुरबाज, 4 - सचिन तेंडुलकर, 4 - इब्राहिम झद्रान, 4 - शहरयार नफीस, 4 - पॉल स्टर्लिंग

आणखी एक रेकॉर्ड नावावर

या खेळीसह, गुरबाज पाकिस्तानविरुद्ध वनडे फॉरमॅटमध्ये 150 किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला पुरुष यष्टिरक्षक ठरला आहे.

धोनीचा मोडला रेकॉर्ड

गुरबाजपूर्वी महेंद्रसिंह धोनी हा यष्टिरक्षक होता ज्याने पाकिस्तानविरुद्ध वनडे फॉरमॅटमध्ये सर्वात मोठी इनिंग खेळली होती.

VIEW ALL

Read Next Story