ना रोहित, ना विराट

'हा' खेळाडू जिंकून देणार टीम इंडियाला वर्ल्ड कप!

मिशन वर्ल्ड कप

आशिया कपमध्ये श्रीलंकेला गुडघ्यावर बसवल्यानंतर आता टीम इंडियाच्या 'मिशन वर्ल्ड कप'ला सुरूवात झाली आहे.

एक्स फॅक्टर कोण?

टीम इंडिया वर्ल्ड कपची प्रमुख दावेदार असल्याचं मानलं जातंय. अशातच आता पाकिस्तानचा माजी कॅप्टन वसिम अक्रम याने भारताच्या विजयाचा एक्स फॅक्टर कोण? यावर वक्तव्य केलंय.

हार्दिक पांड्या

आगामी विश्वचषकात हार्दिक पांड्या टीम इंडियाचं प्रमुख शस्त्र आहे आणि भारत हा जिंकण्यासाठी आवडत्या संघांपैकी एक आहे, असं वसिम अक्रमने म्हटलंय.

टीम इंडियाचं कौतुक

टीम इंडिया यंदा घरच्या मैदानात खेळत आहेत आणि आम्ही ते बॉलसह काय करू शकतात हे आशिया कपमध्ये पाहिलंय, असं म्हणत त्याने टीम इंडियाचं कौतुक केलंय.

कुलदीप यादव

कुलदीपने आशिया चषकात मोठ्या संघांविरुद्धही विकेट्स मिळवल्या. ही एक टीमसाठी जमेची बाजू आहे.

थिंक टँक

भारतीय थिंक टँक खूप चांगलं आहे, जे या मुलांना समर्थन देत आहेत आणि विश्वचषकापूर्वी त्यांच्याकडे योग्य संघ आहे, असंही अक्रम म्हणतो.

टीम इंडिया फेवरेट

दरम्यान, टीम इंडियाकडे चारही आघाड्यावर चांगले खेळाडू आहेत. त्यांचा बेंचमार्क देखील भक्कम आहे. त्यामुळे टीम इंडिया यंदा फेवरेट असेल, असा विश्वास वसिम अक्रम याने व्यक्त केला आहे.

VIEW ALL

Read Next Story