कर्करोगापासून बचाव

गाजराचा रस सेवन केल्यास कर्करोगाच्या पेशींना प्रतिबंध करण्यास मदत होते. यामध्ये असलेले कॅरोटीनॉइड अ‍ॅसिड कर्करोगाचा धोका कमी करते.

रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत

हा रस व्हिटॅमिन 'बी' 6 चा समृद्ध स्रोत आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही या रसाचा आहारात समावेश करू शकता.

डोळ्यांची शक्ती वाढते

डोळ्यांच्या आरोग्यासाठी आपण गाजराचा रस पिऊ शकतो. यामुळे अंधत्व आणि वय-संबंधित डोळ्यांच्या आजारांचा धोका कमी होतो.

हिमोग्लोबिन वाढते

गाजराचा रस दररोज प्यायल्यास शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं आणि तुम्हाला जास्त थकवा येत नाही.

त्वचेसाठी लाभदायक

गाजराचा रसाचे सेवन केल्याने चेहऱ्यावर येणारे पिंपल्स दूर होतात.

दातांची समस्या

गाजरच्या रसाचे सेवन केल्याने डोळ्यांची समस्या, हिरड्या येणाऱ्या रक्ताची समस्या दूर होते. तसेच दातांची चमक वाढते.

कोलेस्ट्रॉल नियंत्रण

कॅरोटीनोईड नावाचं कंपाऊंड गाजरमध्ये आढळते, जे आपल्या हृदयासाठी फायदेशीर आहे. दररोज गाजराचा रस घेतल्यास कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते

पाचनसंस्थेत सुधार

गाजर ज्युसच्या सेवनाने शरीरात रक्त लवकर तयार होते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीराची पचनशक्ती सुधारते.

VIEW ALL

Read Next Story