हांगझोऊ एशियन गेम्समध्ये नेपाळची जबरदस्त कामगिरी सुरु आहे. नेपाळने मालदीवचा 138 धावांनी पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
नेपाळचा जलदगती गोलंदाज अविनाश बोहरा या विजयाचा शिल्पकार ठरला.
डाव्या हाताचा जलदगती गोलंदाज अविनाश बोहराने 3.4 ओव्हर्समध्ये 11 धावा देत 6 विकेट्स घेतले.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील गोलंदाजाने केलेली ही सातवी उत्कृष्ट कामगिरी आहे. तसंच नेपाळी गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा रेकॉर्ड मलेशियाच्या सियाजरुल इद्रसच्या नावावर आहे. चीनविरोधात त्याने 8 धावा देत 7 विकेट्स घेतल्या होत्या
26 वर्षीय अविनाश बोहराने आतापर्यंत नेपाळसाठी 2 वन-डे आणि 38 टी-20 सामने खेळले असून, 48 विकेट्स घेतल्या आहेत.
नेपाळने या सामन्यात 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावत 212 धावा केल्या होत्या. यानंतर मालदीव संघ 19.4 ओव्हर्समध्ये 74 धावातच तंबूत परतला.