'लालबागच्या राजा'ला भक्तांकडून मिळाले भरभरुन दान! काय मिळाले गिफ्ट? जाणून घ्या

मुंबई आणि विशेषत: लालबाग-परळमध्ये गणेशोत्सवाची खरी धूम पाहायला मिळते.

गणेशोत्सव म्हटले की लालबागच्या राजाचे नाव नेहमीच घेतले जाते.

नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात.

लालबागच्या राजाच्या चरणी यंदा भाविकांकडून भरभरुन दान आलंय.

10 दिवसांत राजाच्या दानपेटीत साडे तीन किलो सोने, 64 किलो चांदी अर्पण करण्यात आली आहे.

यासोबतच लालबागच्या राजाच्या चरणी असलेल्या दानपेटीत 5 कोटी 16 लाखांची रोख रक्कम भाविकांनी टाकलीय.

यावेळी एका भक्ताकडून लालबागच्या राजाला इलेक्ट्रिक बाईक अर्पण करण्यात आलीय.

सध्या या सर्व वस्तूंचा लिलाव सुरू असून, भाविकांनी वस्तू घेण्यासाठी गर्दी केलीय.

जवळपास एक किलोचा सोन्याचा हार, चांदीची गदा, सोना चांदीचे मोदक देण्यात आले आहेत.

यासोबतच सीजन क्रिकेट बॅट, सोन्याचा मुलामा दिलेला चांदीच मुकूट भक्तांनी अर्पण केलाय.

VIEW ALL

Read Next Story