टीम इंडियाचे यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देव यांचं नाव घेतलं जातं.
तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं नाव देखील सर्वोत्तम कॅप्टन म्हणून समोर येत असतं.
अशातच इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड लॉईडनं (David LIoyd) भारताच्या सर्वोत्तम कर्णधाराचं नाव घेतलं.
एका मुलाखतीदरम्यान लॉईडनं भारताचा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम कॅप्टन म्हणून ना धोनीचं नाव घेतलं, ना रोहित शर्माचं..
भारताचा महान कॅप्टन कोण असेल तर तो सौरव गांगुली आहे, असं डेव्हिड लॉईडने म्हटलं आहे.
गांगुली कर्णधार बनल्यानं भारतीय क्रिकेटमध्ये आक्रमकता आली. त्यानं भारतीय क्रिकेटला बदलून टाकलं, असं डेव्हिड लॉईड यांनी म्हटलंय.
टीम इंडियाला आज जे यश मिळत आहे त्यामागे गांगुलीची आक्रमक विचारसरणी आहे. ज्यामुळे विरोधी संघालाही विचार करायला भाग पाडलं, असंही डेव्हिड लॉईडने म्हटलं आहे.