फायनलमध्ये धोनीच्या 7 नंबरचा खास योग, थालाची पोस्ट Viral

भारताने साऊथ आफ्रिका संघाला टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये फायनलला 7 धावांनी हरवलं.

भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा हे चॅम्पियनशिप पटकावलं आहे. कोहली 'प्लेअर ऑफ द मॅच' तर जसप्रीत बुमराहला 'प्लेअर ऑफ द सीरिज' पटकावलं.

भारताच्या या विजयामध्ये धोनीचा फेव्हरेट नंबर 7 चं स्पेशल कनेक्शन पाहायला मिळालं. कारण भारतीय संघाने 7 धावांनी हा विजय पटकावला.

सोशल मीडियावर अनेक फॅन्सने म्हटलं की, टी 20 वर्ल्ड कपमध्ये ही 'थाला फॉर द रिझन' असं म्हटलं आहे.

धोनीचा वाढदिवस 7 जुलैला असतो. 7 नंबरची जर्सी घालून धोनी खेळतो.

भारताचा विजय पटकावल्यानंतर 2007 चा टी 20 वर्ल्ड कप विजेता कॅप्टन महेंद्र सिंह धोनीची प्रतिक्रिया Instagram वर आली आहे.

माहीने लिहिलं आहे की, वर्ल्ड कप चॅम्पियन 2024, माझ्या हृदयाचा ठोका वाढला आहे. तुम्ही जे केलंय त्यासाठी अभिनंदन....

थालाने पुढे पोस्टमध्ये लिहिलं की, सगळ्या भारतीयांकडून आणि जगभरातील चाहत्यांकडून वर्ल्ड कप घरी परत आणण्यासाठी खूप खूप धन्यवाद. अभिनंदन. वाढदिवसाचं गिफ्ट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

ब्रिजटाऊनच्या केंसिंग्टन ओवल स्टेडिअममध्ये 29 जून रोजी फायमल सामना साऊथ आफ्रिका आणि भारत यांच्यात झाला. भारताने 7 धावांनी जिंकला.

भारताने पहिल्यांदा बॅटिंग करुन 176/7 चे लक्ष्य साऊथ आफ्रिका संघासमोर ठेवले. साऊथ आफ्रिका टिमने 20 ओव्हरमध्ये 169/8 धावा केल्या.

VIEW ALL

Read Next Story