आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक अर्धशतकं कोणाच्या नावावर? जाणून घ्या

शुभमन गिल - गुजरात टायटन्स

गुजरात पॉईंट टेबलावर अववलं कशी याच उत्तर शोधायचं झालं तर एक नाव समोर येत ते म्हणजे शुभमन गिल. 4 फिफ्टीच्या जोरावर आक्रमक सुरुवात करून देणायचं काम शुभमन करतोय. याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर देखील दिसून येतो.

डेविड वॉर्नर - दिल्ली कॅपिटल

दिल्लीचा एकाकी झुंज देणारा शेर म्हणजे डेव्हिडर वॉर्नर. दिल्लीचा संघ चाचपडत असला तरी कॅप्टन वॉर्नर पुढे येऊन लीड घेताना दिसतोय. त्याने यंदाच्या वर्षी 4 फिफ्टी केल्या आहेत.

ग्लेन मॅक्सवेल - आरसीबी

कोहली आणि डूप्लेसीसच्या नंतर मिडल ऑर्डरमध्ये मॅक्सवेलचा बोलबाला राहिलाय. आतापर्यंत मॅक्सवेलने 4 फिफ्टी ठोकत बंगळुरूची विजयाची मोहीम फत्ते केलीये.

डेव्हॉन कॉनवे - चेन्नई सुपर किंग्स

चेन्नईच्या थालाचा लेफ्ट हँड म्हणून ओळख निर्माण झालेल्या कॉन्व्हेने या आयपीएल हंगामात 5 फिफ्टी झळकावल्या आहेत.

फाफ डूप्लेसीसी - आरसीबी

आरसीबीचा दुसरा स्टार खेळाडू म्हणजे डूप्लेसीसी. फाफने यंदाच्या हंगामात विराटप्रमाणे 6 फिफ्टी केल्या आहेत. यंदाच्या हंगामात कर्णधार म्हणून त्याच्या सर्वाधिक हाफ सेंचूरी आहेत.

विराट कोहली - आरसीबी

विराट कोहली याने यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक 6 अर्धशतकं झळकावली आहे. आरसीबीच्या विजयात विराटचा खारीचा वाटा राहिलाय.

VIEW ALL

Read Next Story