10 लाख भाडं, ओपन पूल अन्... राहुल, अथिय्याच्या 4BHK घराचे Inside फोटो पाहिलेत का?

भरपूर संपत्ती कमवली

क्रिकेटची आवड फॉलो करत या क्षेत्रात यशस्वी झालेल्या के. एल. राहुलने क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर संपत्ती कमवली आहे.

4 BHK घर

के. एल. राहुल हा पत्नी अथिय्या शेट्टीबरोबर मुंबईतील वांद्रे येथील कार्टर रोड परिसरामध्ये एका सी-फेसिंग 4 BHK घरात राहतो.

कधी झाले शिफ्ट?

के. एल. राहुल आणि अथिय्या शेट्टी हे दोघे याच वर्षी जानेवारी महिन्यात विवाहबंधनात अडकले. त्यानंतरच हे दोघे या घरात शिफ्ट झाल्याचं सांगितलं जातं.

10 लाख रुपये भाडं

के. एल. राहुल आणि अथिय्या शेट्टीने या इमारतीमधील संपूर्ण मजलाच भाड्याने घेतला आहे. यासाठी ते दर महिन्याला 10 लाख रुपये भाडं भरतात.

राहुलची सर्वात आवडती जागा

या घरामध्ये के. एल. राहुलची सर्वात आवडती जागा ही लिव्हिंग रुममधील कॉर्नर आहे. येथील काही फोटो त्याने मध्यंतरी शेअर केले होते.

सासूने केलं घराचं इंटीरिअर

के. एल. राहुलची सासू माना शेट्टी यांनी आपल्या लेकीच्या या घराचं इंटीरिअर डिझायनिंग केलं आहे.

सर्वात स्पेशल जागा

के. एल. राहुल आणि अथिय्या शेट्टीच्या घरातील सर्वात स्पेशल जागा म्हणजे घराची बाल्कनी. या बाल्कनीमधून अरबी समुद्राचा पॅनरॉमिक व्ह्यू दिसतो.

ओपन स्वीमिंग पूल

संपूर्ण मजल्यावर पसरलेल्या या घराला एक ओपन स्वीमिंग पूलही आहे. के. एल. राहुल सरावानंतर या पूलचा अनेकदा वापर करतो.

VIEW ALL

Read Next Story