इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल ही क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत टी20 लीग आहे. यातून बीसीसीआयला कोट्यवधींची कमाई होते.
आयपीएलमध्ये जेतेपदाबरोबरच सर्व दहा संघांमध्ये ब्रँड व्हॅल्यूचीही लढाई असते
यंदाच्या आयपीएलमध्ये ब्रँड व्हॅल्यूच्या लढाईत एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली आहे.
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलचं पाचव्यांदा जेचेपद पटकावलं. याबरोबरच त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूत 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
चेन्नई सुपर किंग्सची ब्रँड व्हॅल्यू 212 मिलिअर अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास 1747 कोटी रुपये इतकी आहे. गेल्या वर्षी सीएसकेचा ब्रँड व्हॅल्यू 146 मिलिअन डॉलर होती.
Houlihan Lokey द्वारे हा रिपोर्ट जारी केला जातो. यात सर्व दहा संघांच्या ब्रँड व्हॅल्यूचं मुल्यांकन केलं जातं.
दुसऱ्या स्थानावर विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आहे. बंगलोरची ब्रँड व्हॅल्यू 195 मिलिअर डॉलर आहे.
तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्माची मुंबई इंडियन्स असून त्यांची ब्रँड व्हॅल्यू 190 मिलिअर डॉलर आहे.
चौथ्या क्रमांकावर शाहरुख खानची मालकी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा नंबर लागतो. कोलकाताची कमाई 181 मिलिअन डॉलर आहे.
पाचव्या क्रमांकव दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली आहे. दिल्ली कॅपिटल्सची ब्रँड व्हॅल्यू 133 मिलिअन डॉलर इतकी आहे.