1. विराट कोहली -

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा दिग्गज खेळाडू विराट कोहली याने आपल्या आयपीएलच्या करिअरमध्ये इतर खेळाडूंपेक्षा सर्वात जास्त 120 सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागलं आहे.

2. दिनेश कार्तिक -

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा आणखी एक खेळाडू दिनेश कार्तिक हा पण या लिस्टचा हिस्सा बनला आहे. कार्तिक हा आपल्या आयपीएल करिअरमध्ये एकूण 118 सामने हरलेला आहे.

3. रोहित शर्मा -

मुंबई इंडियन्सचा धासू खेळाडू आणि मुंबईचा माजी कॅप्टन रोहित शर्मा हा आपल्या आयपीएल करिअरमध्ये एकूण 112 सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे.

4. शिखर धवन -

पंजाब किंग्सचा कॅप्टन आणि धाकड खेळाडू शिखर धवनने आपल्या आयपीएल करिअरमध्ये एकूण 107 सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे गेला आहे.

5. रॉबिन उथप्पा -

आयपीएलचा दिग्गज खेळाडू रॉबिन उथप्पा ही या लिस्टमध्ये आहे. उथ्थपाचा एकूण 106 सामन्यात पराभव झाला आहे.

6. एम एस धोनी -

आयपीएलचा सर्वात दिग्गज खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्सचा स्टार, विकेटकीपर फलंदाज महेंद्रसिंग धोनी याला पण आयपीएलमध्ये एकूण 104 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.

7. डेविड वॉर्नर -

दिल्ली कॅपिटल्सचा धाकड फलंदाज डेविड वॉर्नर याने आपल्या आयपीएल करिअरमध्ये एकूण 98 सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे गेला आहे.

8. रविंद्र जडेजा -

चेन्नई सुपर किंग्सचा दमदार ऑलराऊंडर रविंद्र जडेजा हा आपल्या आयपीएल करिअरमध्ये एकूण 95 सामने हरला आहे.

9. भूवनेश्वर कुमार -

सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमार हा खेळाडू पण या यादीचा हिस्सा आहे. भूवनेश्वर कुमारने आयपीएलच्या इतिहासात एकूण 95 सामन्यांमध्ये हार पत्करली आहे.

10. एबी डि व्हिलीअर्स -

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा माजी दिग्गज खेळाडू मिस्टर 360 डिग्री च्या नावाने ओळखरा जाणारा एबी डि व्हिलीअर्स हा आयपीएलच्या एकूण 92 सामन्यात हरलेला आहे.

VIEW ALL

Read Next Story