आयपीएलच्या सतराव्या हंगामाची दणक्यात सुरुवात झालीय. गेल्या 16 हंगामात जे घडलं नाही ते या हंगामात पाहिला मिळालंय.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आतापर्यंत केवळ 17 सामने झालेत. आणि यात षटकारांचा महाविक्रम रचला गेलाय. फलंदाजांनी मैदानावर षटकारांची बरसात केलीय.
आतापर्यंत झालेल्या 17 सामन्यात तब्बल 300 हून अधिक षटकारांची नोंद झाली आहे. आयपीएलमध्ये इतक्या कमी सामन्यात 300 हून अधिक षटकार झाल्याची ही पहिलीच वेळ आहे.
सर्वाधिक षटकरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे तो सनराजयर्स हैदराबादचा फलंदाज हेनरिक क्लासेन. क्लासेननेच्या सर्वाधिक 17 षटकार ठोकलेत.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदा सुनील नरेनाच नंबर लागतो. त्याच्या नावावर तब्बल 12 षटकारांची नोंद आहे.
राजस्थान रॉयल्सचा तुफानी फलंदाज रियान पराग आणि लखनऊ सुपर जायंटसचा फलंदाज निकोलस पूरन यांच्या नावावरही प्रत्येकी 12 षटकार जमा आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सचा मसलमॅन आंद्रे रसेलच्या नावावर यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 10 षटकार आहेत.
तर सनरायजर्स हैदराबादचा युवा फलंदाज अभिषेक शर्माच्या नावावर 11 षटकार जमा आहेत. तर मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्माने आतापर्यंत 9 षटकार ठोकले आहेत.