1. मोहसिन खान -

लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळणारा मोहसिन खान हा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे, मोहसीन हा रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशाकडून खेळतो.

2. हर्षित राणा -

कोलकता नाईट रायडर्सकडून खेळणारा हर्षित राणा हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. हर्षित हा रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळतो. आतापर्यंत आयपीएल 2024 मध्ये हर्षितने गोलंदाजीत कमालीचे प्रदर्शन केलं आहे.

3. सुशांत मिश्रा -

सुशांत मिश्राला गुजरात टायटन्सने 2.20 करोड रूपयात आपल्या टीममध्ये विकत घेतलं होतं. सुशांतने भारताच्या अंडर-19 टीमचेसुद्धा प्रतिनिधित्व केलं आहे, यासोबत सुशांत हा रणजी ट्रॉफीत झारखंडच्या संघाकडून खेळतो.

4. कार्तिक त्यागी -

राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी हा सतत आपल्या गोलंदाजीच्या वेगाने साऱ्या फॅन्सला अचंबिक करत असतो. कार्तिक हा रणजी ट्रॉफीत उत्तर प्रदेशाकडून खेळतो.

5. मुकेश चौधरी -

चेन्नई सुपर किंग्सचा उजव्या हाताचा हा गोलंदाज ताशी 150 किमी गोलंदाजी करायची क्षमता ठेवतो. मुकेश हा रणजी ट्रॉफीत महाराष्ट्राच्या संघाकडून खेळतो.

6. मयंक यादव -

लखनऊ सुपर जाएंट्सचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मयंक यादव हा आयपीएल 2024 मध्ये कहर करत आहे. मयंक हा सहज गोलंदाजी करताना ताशी 150 किमी चा स्पीड ओलांडत आहे. मयंक यादव हा रणजी ट्रॉफीत दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करतो.

VIEW ALL

Read Next Story