आयपीएलमध्ये रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सचा पराभव केला. आयपीएलमधला बंगळुरुचा तिसरा विजय ठरलाय.
बंगळुरुच्या या विजयाचा हिरो ठरला तो स्टार फलंदाज विराट कोहली. विराटने विल जॅकबरोबर पार्टनरशिप करत शानदार विजय मिळवून दिला.
कोहलीने नाबाद 70 धावांची खेळी केली. यात विराटने सहा चौकार आणि तीन षटकारांची बरसात केली. या खेळीबरोबरच विराटने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला.
विजयी आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने सर्वाधिक वेळा 50 हून जास्त धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरलाय.
विराट कोहलीने आयपीएलमध्ये रनचेज करताना तब्बल 24 वेळा पन्नास किंवा त्याहून जास्त धावा केल्या आहेत.
याआधी शिखर धवनने आतापर्यंत 23 वेळा अशी कामगिरी केली आहे. तर केएल राहुलने 22 आणि गौतम गंभीरने 20 वेळा हा विक्रम केलाय.
आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वात जास्त 50 आणि त्याहून जास्त धावा करण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. वॉर्नरने आतापर्यंत 35 वेळा हा कारनामा केलाय.
विराट कोहलीने गुजरातविरुद्ध चौथ्यांदा पन्नासहून अधिक धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामात विराटने 500 धावांचा टप्पा पार केलाय.