पाच वेळा जेतेपद पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल 2024 मध्ये लीगमध्येच गाशा गुंडाळावा लागला

लीगच्या शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्सचा 27 धावांनी पराभव केला.

या सामन्यानंतर महेंद्र सिंग धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

त्यातच चेन्नईच्या चेपॉक मैदानावरच्या शेवटच्या सामन्यानंतर धोनी लॅप ऑफ होनर देण्यात आला होता. त्यामुळे या चर्चांना अधिकच वेग आला.

आता धोनीचा जिगरी मित्री आणि चेन्नईचा माजी खेळाडू सुरेश रैनाने यावर मोठा खुलासा केला आहे. धोनी आयपीएलचा पुढचा हंगामही खेळू शकतो असं रैनाने म्हटलंय.

धोनी अजून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ऋतुराज अद्याप कर्णधारपदासाठी परिपक्व झालेला नाही. पुढच्या हंगामात धोनीकडे पुन्हा कर्णधारपद सोपवलं जावं असं मतही रैनाने व्यक्त केलंय.

आयपीएलच्या सतराव्या हंगामात धोनीने दमदार कामगिरी केली आहे. 11 डावात धोनीने 220.54 च्या स्ट्राईक रेटने 161 धावा केल्यात.

VIEW ALL

Read Next Story