टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आयपीएल 2024 मध्ये दमदार कामगिरी करतोय.

आयपीएलमध्ये चेन्नईने आतपर्यंत खेळलेल्या 8 सामन्यात माहिने 260 च्या स्ट्राईकरेटने 91 धावा केल्यात.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात धोनीने हार्दिका पांड्याला मारेले सलग तीन षटकार क्रिकेट चाहते विसरलेले नाहीत.

प्रत्येक स्टेडिअममध्ये धोनीची क्रेझ पाहायला मिळतेय. आता धोनीने पुन्हा टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळावा अशी क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा आहे.

धोनीचे माजी सहकारी इरफान पठाण आणि वरुण अॅरोननेही धोनीने भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करावं अशी इच्छा व्यक्त केली आहे.

टी20 वर्ल्ड कप संघात धोनीला वाइल्डकार्ड एन्ट्री देऊ शकतो असं वरुन अॅरोनने म्हटंलय. तर धोनीने इच्छा व्यक्त केल्यास त्याला विरोध होणार नाही असं इरफान पठाणने म्हटंलय.

धोनीच्या फलंदाजीने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही प्रभावित झालाय. पण माहिला वर्ल्ड कपसाठी राजी करणं थोडं अवघड असल्याचं रोहितने सांगितलं.

VIEW ALL

Read Next Story