2023 हे वर्ष भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी भयंकर काळोखी रात्र ठरले.
यावर्षी रोहित शर्माला एकामागून एक अनेक झटके बसले.
रोहितने कर्णधार म्हणून दोन 'आयसीसी ट्रॉफी' गमावल्या.
रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने फायनल गमावून आयसीसीच्या दोन्ही ट्रॉफी गमावल्या.
या वर्षी जूनमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
डब्ल्यूटीसी फायनलमध्ये रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव झाला.
यानंतर ऑस्ट्रेलियाने २०२३ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत टीम इंडियाचा मायदेशावर पराभव केला.
विश्वचषक विजेतेपदाच्या सामन्यात रोहित ब्रिगेडचा 6 विकेट्सनी पराभव झाला.
यानंतर मुंबई इंडियन्सने त्याला आयपीएल 2024 पूर्वी कर्णधारपदावरून हटवले.
मुंबईने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले.