रोहितनंतर पंड्याच कर्णधार असं मुळीच नाही; हे चौघेही कॅप्टनशीपच्या शर्यतीत

Swapnil Ghangale
Nov 30,2023

उत्तम नेतृत्व

रोहित शर्माने नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये भारतीय संघाचं उत्तम पद्धतीने नेतृत्व केलं.

करिअरच्या शेवटाकडे वाटचाल

36 वर्षीय रोहित शर्मा हा त्याच्या करिअरच्या शेवटाकडे वाटचाल करत आहे.

रोहितनंतर कर्णधार कोण?

रोहितच्या निवृत्तीची आताच चर्चा सुरु झाली आहे. मात्र रोहितनंतर कर्णधार कोण असा प्रश्न आताच विचारला जातोय.

धोनीनंतर कोहली होता पण...

एम. एस. धोनीनंतर विराट कोहली हा पुढील कर्णधार होईल हे स्पष्ट होतं. मात्र सध्या असं चित्र दिसत नाही. सध्या तरी हार्दिक पंड्यापासून के. एल. राहुलपर्यंत अनेक जण कर्णधारपदावर दावेदारी सांगत आहेत.

शर्यतीत कोण?

रोहित शर्माच्या जागी दावेदारी सांगणारे नेमके कोण आहेत? या शर्यतीत कोण कोण आहे जाणून घेऊयात.

हार्दिक पंड्या

हार्दिक पंड्या मागील वर्षभरापासून टी-20 मध्ये भारताचा पर्यायी कर्णधार म्हणून पाहायला मिळाला आहे. मात्र अनेकदा तो जखमी होत असल्याने त्याच्या नावाबद्दल शंका व्यक्त केली जातेय.

के. एल. राहुल

के. एल. राहुलने एकदिवसीय क्रिकेट, टी-20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये तो उपकर्णधार होता.

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव हा वर्ल्ड कप 2023 नंतर सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीमध्ये कर्णधारपद भूषवत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही सूर्याच कर्णधार म्हणून दिसणार आहे.

जसप्रीत बुमराह

इंग्लंडविरुद्धच्या 2022 च्या पाचव्या कसोटीमध्ये रोहित शर्माऐवजी जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाचा कर्णधार होता. रोहित, कोहली वगळता केवळ बुमराह असा खेळाडू आहे ज्याची कसोटीमधील जागा निश्चित आहे. तो कसोटीसाठी उत्तम कर्णधार ठरु शकतो.

ऋषभ पंत

ऋषभ पंत जखमी होण्याआधी कसोटी क्रिकेटचा कर्णधार म्हणून शर्यतीत होता. पंत मैदानात येईल तेव्हा त्याचा नक्कीच कर्णधारपदासाठी विचार केला जाईल.

VIEW ALL

Read Next Story