भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियनमध्ये कसोटीचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याला विशेष महत्त्व आहे कारण हा कसोटी सामना बॉक्सिंग डे रोजी खेळला जाणार
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या मधील सामना 26 डिसेंबर पासून सेंच्युरियनमध्ये खेळला जाणार आहे.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार .
या सामन्यांना विशेष महत्त्व आहे कारण दोन्ही सामने बॉक्सिंग डेला सुरू होत आहेत.
बॉक्सिंग डेच्या संदर्भात, तुम्हाला वाटेल की बॉक्सिंगशी त्याचा काहीतरी संबंध असेल, परंतु तसे नाही. 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 डिसेंबरला बॉक्सिंग डे म्हणतात.
बॉक्सिंग डे त्या लोकांना समर्पित आहे जे ख्रिसमसच्या दिवशीही सुट्टी न घेता आपल्या कर्तव्यात गुंतलेले असतात.
बॉक्सिंग डेच्या दिवशी लोकांना गिफ्ट बॉक्स देऊन आनंद व्यक्त केला जातो.त्यामुळे ख्रिसमसच्या नंतरच्या दिवसाला बॉक्सिंग डे म्हणतात.